ladki bahin yojana 17th installment dateमहाराष्ट्र सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू केलेली लाडकी बहीण योजना आज प्रत्येक घराघरात पोहोचली आहे. या योजनेतून राज्यातील लाखो बहिणींना दर महिन्याला 1500 रुपये मदत मिळते. अनेक महिलांनी या पैशांचा उपयोग घरखर्च, मुलांचे शिक्षण, गरजा किंवा छोट्या व्यवसायासाठी केला आहे. त्यामुळे या योजनेने महिलांच्या जीवनात मोठा हातभार मिळतो.
17 वा हप्ता कधी मिळणार
नोव्हेंबर 2025 मधील लाडकी बहीण योजना 17 वा हप्ता बहुतेक लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात 25 नोव्हेंबर 2025 ते 38 नोव्हेंबर 2025 या कालावधीत जमा होण्याची शक्यता आहे. सरकारने यापूर्वीच्या हप्त्यांप्रमाणेच हा हप्ता देखील थेट DBT मार्फत पाठवला जाणार आहे.
सरकारने सुरू केली महिलांसाठी अंगणवाडी भरती
पैसे खात्यात आले आहेत का हे कसे तपासायचे
- तुमच्या बँकेचा मेसेज पाहा dbt Ladki Bahin Yojana असा मेसेज आल्यास तुमचे पैसे आले आहेत.
- काही वेळा सर्वांच्या खात्यात एकाच दिवशी पैसे येत नाहीत, त्यामुळे थोडा वेळ धीर धरा.
योजनेचा उद्देश काय आहे
या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे. अनेक वेळा घरातील महिलांना लहानसहान गोष्टींसाठी इतरांवर अवलंबून राहावे लागते. पण या योजनेमुळे त्या काहीतरी करू शकतात. काही बहिणींनी या पैशांतून लहान उद्योग सुरू केले आहेत, तर काहींनी शिक्षण किंवा आरोग्यावर खर्च केला आहे.
अर्ज केलेल्या पण पैसे न मिळालेल्या महिलांनी काय करावे
जर तुम्ही अर्ज केला आहे पण अजून पैसे मिळाले नाहीत, तर सर्वप्रथम तुमचे KYC आणि बँक खाते लिंक तपासा. काही वेळा चुकीचा खाते क्रमांक, अपूर्ण KYC किंवा बँक अपडेट न झाल्यामुळे हप्ता थांबतो. अशा वेळी जवळच्या महिला व बाल विकास कार्यालयात संपर्क करा.
पुढील हप्त्यांची माहिती
सरकार दर महिन्याला एक हप्ता जारी करते, त्यामुळे डिसेंबर महिन्याचा 18 वा हप्ता 25 डिसेंबर 2025 च्या आसपास अपेक्षित आहे. जर सर्व माहिती बरोबर असेल तर पुढील महिन्यांमध्ये देखील तुम्हाला वेळेवर हप्ते मिळत राहतील.
निष्कर्ष
लाडकी बहीण योजना ही फक्त आर्थिक मदत नाही. तर राज्यातील महिलांना दिलेला आत्मविश्वासाचा हात आहे. सरकार महिलांना आर्थिकदृष्ट्या मजबूत बनवून समाजात त्यांचे स्थान उंचावण्याचा प्रयत्न करत आहे. जर तुम्ही पात्र असाल आणि अजून अर्ज केला नसेल.
