Ladki bahin new form apply : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत दोन वेळा महिलांचे फॉर्म भरणे झाले आहेत आणि आत्ता महिला तिसऱ्या रजिस्ट्रेशनची म्हणजेच की परत फॉर्म केव्हा सुरू होणार याची वाट बघत आहेत. आता त्या महिलांची प्रतीक्षा संपली कारण आता सरकारने परत लाडकी बहीण योजनेचे नवीन अर्ज सुरू केले आहेत.
तुम्ही घरी बसल्या सुद्धा आता अर्ज करू शकता तो तुम्हाला कसा करायचा आहे आणि कोण कोणती कागदपत्र आणि पात्रता काय असणार आहे हे मी तुम्हाला पुढे या लेखांमध्ये सांगणार आहे तर हा लेख संपूर्ण वाचा.
लाडकी बहीण योजनेचे फायदे
माझी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेली योजना ही म्हणजेच लाडकी बहीण योजना या योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना प्रति महिन्याला 1500 रुपये हे दिले जातात. आणि आणि आत्तापर्यंत या योजनेचे दोन वेळा अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आणि आत्ता ज्या काही महिला अर्ज करण्याच्या बाकी आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे कारण आता अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहेत.
त्यासाठी तुमच्याकडे पुढील प्रमाणे पात्रता आणि आता काही नवीन कागदपत्र लागणार आहेत ते सर्व तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. ते कोण कोणते आहेत हे माहिती करण्यासाठी हा लेख पूर्ण वाचा
Ladki bahin yojana पात्रता
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना या योजनेचे नवीन रजिस्ट्रेशन सुरू होणार आहेत तरी अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे ही पात्रता असणे गरजेचे आहे.
- सर्वप्रथम अर्ज करणारी महिला या महिन्याची वय हे 21 ते 59 असणे गरजेचे आहे.
- व महिला पीएम किसान व नमो शेतकरी या दोन योजनेचा लाभ घेत असेल तर त्या महिलेला आता या योजनेसाठी अर्ज करता येणार नाही.
- व महिला इकडे चार चाकी वाहन म्हणजेच की ट्रॅक्टर, फोर व्हीलर, असे काही वाहने नसायला पाहिजे.
- व महिलेचे वार्षिक उत्पन्न हे 2.50 लाख एवढे असायला पाहिजे.
- तेव्हाच ती महिला लाडकी बहीण योजनेचा नवीन अर्ज करण्यासाठी पात्र असेल.
आत्ता आपण या योजनेसाठी कोण कोणती नवीन कागदपत्र लागणार आहेत हे पुढील प्रमाणे बघणार आहे.
लाडकी बहीण योजने साठी लागणारी कागद पत्रे
Ladki bahin Yojana apply online करण्यासाठी तुमच्याकडे ही महत्त्वाची कागदपत्रे असणे गरजेचे आहे.
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- रहिवासी दाखला
- मतदान कार्ड
- बर्थ सर्टिफिकेट
- पासपोर्ट साईज फोटो
वरील प्रमाणे तुम्हाला असे काही महत्त्वाचे कागदपत्र लागणार आहेत हे तुमच्याकडे असणे गरजेचे आहेत तेव्हाच तुम्ही या योजनेचा अर्ज करू शकता व आता आपण या योजनेचा अर्ज कसा करायचा हे पुढील प्रमाणे बघणार आहे.
Ladki Yojana apply online 3.0
- सर्वप्रथम तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा नवीन अर्ज करण्यासाठी तुम्हाला नारीदूत ॲप किंवा लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
- त्यानंतर तिथे लॉगिन करायचं आहे.
- लॉगिन केल्याच्या नंतर तुम्हाला आधार क्रमांक आणि मी सांगितलेली वरील सर्व कागदपत्रे तिथे अपलोड करून घ्यायची आहेत.
- अपलोड केल्यानंतर तुम्हाला 48 घंट्यामध्ये तुम्हाला कळविण्यात येईल की तुम्ही या योजनेसाठी पात्र झाला आहात आणि त्यानंतरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल.