Farmer ID: भारत सरकारने एक नवीन कार्ड सुरू केलं आहे ते कार्ड म्हणजे फार्मर आयडी फार्मर आयडी च्या साह्याने तुम्ही पिक विमा व कोणत्याही नवीन शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या योजना चा लाभ या कार्डच्या मार्फत घेऊ शकता. आपण फार्मर आयडी फक्त पाच मिनिटात मोबाईलवर घर बसल्या बनवू शकतो ते कसे हे आपण पुढे या लेखांमध्ये बघणार आहे.
फार्मर आयडी म्हणजे काय
केंद्र सरकारने सुरू केलेले Farmer ID म्हणजे या कार्डच्या माध्यमातून तुम्ही सरकारने शेतकऱ्यांसाठी कोणतीही नवीन सरकारी योजना सुरू केली असेल त्या योजनेचा अर्ज तुम्ही करू शकता जसे की गाई म्हशी योजना, ठिबक सिंचन योजना, तुषार सिंचन योजना, pm किसान सन्मान निधी योजना, नमो शेतकरी योजना आता या सर्व योजनांसाठी तुम्हाला सरकारने फार्मर आयडी ही अनिवार्य केली आहे.
आणि सरकार हे Farmer ID फक्त अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठीच सुरू केले आहे अल्पभूधारक म्हणजे काय ज्या शेतकऱ्यांकडे फक्त 5 एकर पेक्षा कमी शेती आहे ते शेतकरी म्हणजे अल्पभूधारक शेतकरी आहेत आणि त्यांनाच हे फार्मर आयडी कार्ड मिळू शकतं आणि त्यांनाच सर्व योजनेचा लाभ मिळू शकतो. हे कार्ड तुम्ही घरी बसल्या मोबाईल सुद्धा बनवू शकता ते कसे हे आपण पुढे या लेखांमध्ये बघणार आहे.
हे ही वाचा शेतकऱ्यांना मिळणार मोफत फवारणी पंप 100% अनुदान
फार्मर आयडी कार्डचे महत्त्व आणि फायदे
- Farmer ID चे तशे तर खूप सारे फायदे आहेत पण एक फायदा म्हणजे की तुम्हाला कुठल्याही सरकारी योजनेचा लाभ मिळतो
- तुम्हाला कोणत्याही सरकारी योजने मधून अपात्र करता येत नाही व थेट लाभ तुमच्या बँक खात्यात मिळतो.
- आणखीन तुम्हाला कुठे ही कागदपत्रे देण्याची गरज नाही तुम्ही फार्मर आयडी च्या माध्यमातून डिजिटल कागदपत्रे देऊ शकता
Farmer ID साठी लागणारी कागदपत्रे
आता आपण Farmer ID बनवताना तुमच्याकडे ही कागदपत्रे असणे गरजेचे आहेत तेव्हाच तुम्ही फार्मर आयडी कार्ड बनवू शकता.
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- रहिवासी दाखला
- विज बिल
- कास्ट सर्टिफिकेट
- पासपोर्ट साईज फोटो
- पॅन कार्ड
- मोबाईल क्रमांक
- सातबारा
- व गाव नमुना आठ
अर्ज करताना ही वरील सर्व महत्त्वाची कागदपत्र तुमच्याजवळ असणे गरजेचे आहे किंवा तुम या योजनेचा व फार्मर आयडी चा अर्ज करू शकता.
फार्मर आयडी साठी अर्ज कसा करावा
- सर्वप्रथम करण्यासाठी farmer registry या सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
- तिथे गेल्याच्या नंतर तुम्हाला सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करावे लागेल.
- रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला आधारची गरज लागेल आणि ओटीपी ची गरज लागेल
- त्यानंतर तुम्हाला महत्त्वाची कागदपत्रे अपलोड करून घ्यायची आहे
- लोड केल्यानंतर तुम्हाला सक्सेस फुल चा म्हणजेच की यशस्वी झाल्याचा मेसेज येईल.
- व काही दिवसानंतर तुमचे फार्मर आयडी बनवून तयार होईल
वारंवार विचारले जाणारे प्रश्न FAQ
फार्मर आयडी क्रमांक कसा मिळवायचा?
Ans- त्यासाठी तुम्हाला farmer registry या वेबसाईटवर जाऊन तुम्ही क्रमांक बघू शकता.
महाराष्ट्रात शेतकरी आयडीचा काय फायदा आहे?
Ans- फार्मर आयडीच्या साह्याने तुम्ही कुठल्याही योजनांचा लाभ घेऊ शकता.
शेतकरी ओळखपत्र का आवश्यक आहे?
Ans- फार्मर आयडी च्या साह्याने तुमची शेतकरी आहात म्हणून ओळख होते आणि तुमची जमीन ही डिजिटल पोर्टलमध्ये अपडेट होते