Government Scheme: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! दरमहा ₹3000 पेन्शन देणारी योजना सुरू

Pradhanmantri Kisan mandhan Yojana: शेतामध्ये दिवसरात काम करणाऱ्या जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सरकारने एक नवीन पेन्शन योजना सुरू केलेली आहे. ही पेन्शन योजना शेतकऱ्यांना त्यांच्या वृद्ध वयामध्ये एक वरदान ठरणार आहे कारण या योजनेमध्ये शेतकऱ्यांना व शेतकऱ्यांच्या पत्नीला महिन्याला पेन्शन म्हणून ₹3000 रुपये मिळणार आहेत. प्रधानमंत्री किसान मानधन योजना  (PM-KMY) या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना वयाचे 60 वर्ष पूर्ण होतात ही पेन्शन योजना सुरू होते.

तुम्ही पण तुमचा पुढील आयुष्याचा विचार करत असाल तर आता तुम्हाला विचार करण्याची गरज नाही कारण प्रधानमंत्री मानधन योजना या योजनेच्या लाभार्थ्यांना महिन्याला तीन हजार रुपये मिळतात व लाभार्थ्याचा मृत्यू झाल्याच्या नंतर लाभार्थ्याच्या पत्नीला दीड हजार रुपये महिन्याला मिळतात. ही योजना शेतकऱ्यांसाठी एक उम्मीद घेऊन आलेली योजना आहे या योजनेचा अर्ज कसा करायचा आणि पात्रता काय आहे आणि आवश्यक कागदपत्रे कोण कोणती आहेत हे आपण पुढे लेखांमध्ये बघणार आहोत. 

प्रधानमंत्री मानधन योजना काय आहे?

प्रधानमंत्री किसान मानधन पेन्शन योजना ही पेन्शन योजना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली एक योजना आहे या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना वृद्धपणामध्ये आर्थिक मदत दिली जाते. या योजनेचा आत्तापर्यंत करडू शेतकरी लाभ घेत आहेत व या योजनेमध्ये वयाचे साठ वर्ष पूर्ण होताच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये येण्यास सुरुवात होतात. म्हणजेच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्षाला 36 हजार रुपये वितरित करण्यात येतात. आणि काही कारण असता शेतकऱ्याची मृत्यू झाली असेल शेतकऱ्यांच्या पत्नीला प्रतिमा दीड हजार रुपये दिले जातात.

अर्ज करण्यासाठी पात्रता

प्रधानमंत्री किसान मानधन योजना या योजनेचा अर्ज करण्यासाठी लाभार्थ्याचे वय 18 ते 40 या दरम्यान असणे गरजेचे आहे तेव्हाच तुम्ही या योजनेचा अर्ज करू शकता. 

अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांच्या नावावर फक्त दोन हेक्टर पेक्षा कमी शेती असणे गरजेचे आहे तेव्हाच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. 

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे महिन्याचे इन्कम हे ₹15000 रुपये पाहिजे 

प्रधानमंत्री किसान मानधन योजना या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला वयाच्या 18 वर्षे असताना 55 रुपये हे भरावे लागतील आणि वयाचे 40 वर्ष पूर्ण होताना तुम्हाला दोनशे रुपये प्रतिमा भरावे लागतील. या योजनेचा पुढे तुम्हाला साठ वर्षाच्या नंतर लाभ मिळतो यामध्ये तुम्हाला प्रतिमा 3000 रुपये दिले जातात व तुमचा मृत्यू झाल्यास तुमच्या पत्नीला दीड हजार रुपये प्रतिमा दिले जातात.

अर्ज कसा करावा

अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला सीएससी केंद्रावर जावे लागेल csc केंद्रावर गेल्याच्या नंतर तुम्हाला तिथून तुम्ही अर्ज करू शकता. अर्ज करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे सोबत न्यावी. 

तुम्हाला अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम आधार कार्ड, राशन कार्ड, रहिवासी दाखला, बँक पासबुक, तुमचे व तुमच्या पत्नीचे, ही महत्त्वाची कागदपत्रे घेऊन तुम्हाला सीएससी केंद्रावर जाऊन अर्ज करावा लागेल अर्ज केल्याच्या नंतर तुम्हाला प्रतिमा ऑनलाईन प्रक्रियेने प्रतिमा 55 ते 200 रुपये भरावे लागतील. 

टीप – ही सर्व माहिती इंटरनेटवर घेतलेली आहे तर अर्ज करण्याआधी या योजनेची संपूर्ण माहिती बघा व त्यानंतरच अर्ज करा.

E-shram कार्ड योजनेची नवीन अर्थ सुरू अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment